वृत्तांत : अवघा रंग एक झाला

गेली बरीच वर्ष मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात चित्रपट संगीताचा प्रवासरागांवर आधारित गाणी असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करणाऱ्या स्वरनाद ने या भक्तिगीते अशी साधी सोपी थीम निवडली खरी पण हे शिवधनुष्य उचलणे काही सोपे नव्हते. संत-साहित्यअभंग विविध भाषांमधील भक्तिगीतं या सर्वांना या एक दीड तासाच्या कार्यक्रमात न्याय देणे खरोखरच कठीण होते. 

नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री गणेशाला वंदन करून "ओंकार प्रधान रूप गणेशाचे" या गीताने अाभाने कार्यक्रमाला सुरुवात केली. अंकुश चित्रपटातील "इतनी शक्ती हमे देना दाता" ही आळवणी केदार आणि सहकाऱ्यांनी केली. 

विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझ्या जनीच नाही कोणी.  
हाती घेऊनिया पाणी केस विंचरून घाली वेणी. 

असा विठ्ठलाला आई बाप मानून त्यांच्याकडे लडीवाळपणे हट्ट करणार संत जनाबाई "यांच जनी उकलली वेणी" हे अतिशय गोड गीत केदारने सादर केलं. श्री विठ्ठल इतकच कवी गायक संगीतकारांना मोह घालणारं दुसर रूप म्हणजे श्रीकृष्ण. हृदयनाथ मंगेशकरांनी मीरा भजन आणि "चाला वाही देस" हे दोन संत मीराबाईंच्या भजनांचे अजरामर अल्बम प्रसिद्ध केले आहेत. त्यातलं "म्हारा रे गिरीधर गोपाल" हे भजन ज्योती कुलकर्णीने सादर केलं. महाराष्ट्राप्रमाणे उत्तर भारतातही मोठी संत परंपरा आहे. यातील सुप्रसिद्ध संत तुलसीदास यांचं प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रूपाचं वर्णन करणार अद्वितीय गीत "श्रीरामचंद्र दयाळू" भजन लीना यांनी गाइलं. हीच परंपरा चालवत संत दादू दयाल यांचा श्रीनिवास कळ्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत "अजून निकसे प्राण" हे केदारने गाइलं. हे गीत खूप लोकप्रिय नसल्याने बऱ्याच जणांना माहीत नव्हते खरं पण केदारच्या सुंदर सादरीकरणाने मोठीच दाद घेऊन गेलं.





यानंतर महाराष्ट्रभूमीत परत येत संत ज्ञानेश्वरांचं "मोगरा फुलला" हे अतिशय सुप्रसिद्ध गाणं सादर करून आभा जोगळेकरनं सर्वांचीच मन प्रसन्न करून टाकली.  अभंग भजनाबरोबर चित्रपट गीतातही भक्तीरस मोठ्या प्रमाणात आढळतो. सख्य भक्ती आणि दास्य भक्ती ही दोन्हीही रुप एकाच वेळेला एकाच गीतातून अतिशय उत्कृष्टपणे मांडलेलं रवींद्र जैन यांचं "एक राधा एक मीरा" हे लीनाने गायलेलं गाणं ही प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाचं उतरलं. भक्तिगीतांचा कार्यक्रम संत परंपरेतील मुकुटमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगा शिवाय पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे सर्वजण तुकाराम महाराजांच्या अभंगांची वाट बघत होते. श्रीनिवास खळेंच्या अभंग तुक्याचे या माळेतील एक अजोड मणी "आनंदाचे डोही आनंद तरंग" योगेश सेवक यांनी सादर करून वाहवा मिळवली. कवयित्री शांता शेळकेंची सरस्वती स्तुतीची  कविता जी आपण लहानपणापासून प्रार्थना म्हणून म्हणताल होत :जय शारदे वागीश्वरी" सादर करून केदार कुलकर्णीने कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला. "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" या शेवटच्या गीतात तर ज्योती कुलकर्णी आणि कलाकारांबरोबर प्रेक्षकही सामील झाले.  

आभालीनाज्योतीकेदार व योगेश या गायकांबरोबरच अभिनयामध्ये नितीन कुलकर्णी व सचिन गोडबोले या वादकांनी कार्यक्रमाला रंगत आणली. निवेदन मंजिरी सबनीस हिच्या सहकार्याने गंधाली सेवकने केले. 

मी तू पण गेले वाया 
पाहता पंढरीच्या राया 
अवघा रंग एक झाला 
अवघा रंग एक झाला
असा संदेश डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला हा कार्यक्रम म्हणजे स्वरनादच्या मालिकेतील एक सुंदर पुष्प म्हणावे लागेल.                         


गंधाली सेवक 


1 comment: