नमस्कार,
समस्त भारत वर्षाचा आनंदांचा सण
दिवाळी जवळ येत आहे.
मराठी रसिकांना खाद्य पदार्थांइतकीच
साहित्याची मेजवानी ही महत्त्वाची वाटते, यामुळे आम्ही कट्ट्याचा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करायचे
ठरवले आहे.
या निमित्ताने मित्रमंडळ कट्टा एक स्पर्धा आयोजित करीत
आहे.
लेख स्पर्धा
लेखक मित्रहो, उचला आपली लेखणी, द्या आपल्या सृजनक्षिलतेला
ताण आणि पाठवा आम्हाला लेख, तुमच्या स्वतःच्या खास
शैलीत.
विषय -
१. कुछ कह रही हैं किताबें,
२. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गरज व अतिरेक,
३. सोशल मीडिया की सोसेल तेवढा मीडिया,
४. भारतीय सणांचे स्वरूप व पर्यावरण,
५. माझा स्वयंपाक घरातील अविस्मरणीय अनुभव
नियम -
- स्पर्धेसाठी पाठवलेले लेख मराठी भाषेत व स्व-लिखित असावेत.
- स्पर्धा
सर्व मराठी प्रेमी लेखकांसाठी खुली आहे. भाग घेण्यासाठी मित्र मंडळाचे
सदस्यत्व बंधनकारक नाही.
- शब्दमर्यादा - ७०० ते १००० शब्द, लेख गुगल फॉन्ट मध्ये टाईप केलेला असावा.
- लेख mitramandalkatta@gmail.com या पत्त्यावर दिनांक १० ऑक्टोबर च्या आत ई-मेल
करावा.
- मेलच्या सब्जेक्ट लाइनमध्ये 'लेख स्पर्धा' असे नमूद
करणे गरजेचे आहे.
- तुम्ही तुमच्या लेखा सोबत इमेजदेखील जोडू शकता. पाठवलेले इमेज हे कॉपीराईट फ्री असावेत.
- लेखकाचे म्हणजे आपले नाव ई-मेल मध्ये असावे पण लेखाच्या फाईल मध्ये
नसावे.
प्रथम पारितोषिक - 1000
व्दितीय पारितोषिक - 750
तृतीय पारितोषिक - 500
धन्यवाद !
pl publish results!
ReplyDelete