सकाळी चहाच्या कपासरशी,
आठवण येते ती माझीच
चुरचुरीत मजकुराने
बातमीपत्रात,
भरलेल्या माझ्या
अस्तित्वाची
वर्तिले काय कोठे?
शोधिले काय कसे?
तंतोतंत तपशिले,
जाणण्यास आतुरता मनी दाटे
माझ्याच अस्तित्वाने,
किंमत असते बातमीपत्रास
केले वाचन एक वार,
अन्, बातमीपत्र रद्दीला भार
काय करणार मीडिया, नुरता मी,
सुन्या पडणार वाहिन्या, माझ्या-विण,
चुरस कशी लागणार, तयात सदा,
प्रसारित करण्यात, सर्वप्रथम मला
पापणी लवण्या अवधीत,
पोहचते जगाच्या काना
कोपऱ्यात
प्रगत टेली-कॉम्युनिकेशनने
गती माझी, झाली अफाट
गेले, ते दिन पूर्वीचे,
गावाच्या वेशी, झाडाच्या पारी,
व्हायची चर्चा माझी,
तोंडोतोंडी मला चघळण्याची,
असती माझ्या तऱ्हा अनेक,
मंदगती तर कधी जलद,
मूकबधिरांसाठी तर,
केले जाते खास आयोजन
घडविण्यात रामायण,
ठरले मीच कारणभूत,
मंथरेकरवी मला देवून,
कैकयीचे दिले कान फुंकून.
सुखदुःखाचे, हर्ष उल्हासाचे,
आनंद वा इशारे भयाचे,
विविध अशा भावनांचे,
हृदयी मम वसती सारे
------------------------------------------------------------------------------------
-वैशाली वर्तक
Poet's Name is Vaishali Vartak ...not Vasanti...please request to change it if you can.
ReplyDelete