नमस्कार
मैत्रिणींनो!
आदरणीय सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रियांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सुवर्णसंधीमधे रूपांतर करून, तर काही स्त्रियांनी स्वतः नवीन वाटा निर्माण करुन समस्त स्त्रीवर्गाला नवीन दालने खुली केली.
८
मार्च महिला जागतिक दिन. या दिवशी एका प्रश्नमंजूषेच्याच्या
निमित्ताने आपण त्यांचे स्मरण करू या.
प्रश्न :
१. एक अशिक्षित महिला, जी १९४७ साली लंडनमध्ये स्थायिक
झाली व पुढे स्वतःच्या बळावर मिलेनिअर झाली.
२. पहिली भारतीय महिला फोटोजर्नालिस्ट.
३. पहिली भारतीय महिला जिने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले.
४. व्हॉएजर १ या स्पेसक्राफ्टमध्ये असलेल्या 'sounds of
earth' या म्युझिक सीडीमध्ये ज्यांचे गाणे आहे त्या एकमेव भारतीय गायिका.
५. पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार.
६. ‘फर्स्ट लेडी’ ऑफ इंडियन सिल्वर स्क्रीन.
७. ऑलिम्पिक वैयक्तिक खेळात फायनलमध्ये पोचणारी
पहिली भारतीय महिला.
८. ODI मध्ये जगात सर्वप्रथम २०० विकेट घेऊन भारताची
शान वाढवणारी क्रिकेटिअर.
९. शास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय
महिला.
१०. Food and Beverage इंडस्ट्रीमधल्या जगातल्या
दुसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीची सीईओ असलेली भारतीय महिला.
No comments:
Post a Comment