साहित्य - १ वाटी तांदूळ पीठी, १ वाटी पाणी, तेल, मीठ, कोथिंबीर, हळद, हिंग, जीरे आणि हिरवी मिरची
कृति - १ वाटी पाणी उकळत ठेवावे. पातेल्यातील
पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ चमचा तेल घालावे. नंतर १वाटी तांदूळाची पीठी घालून
ढवळावे. झाकण ठेऊन वाफ आणावी.उकड गरमअसतानाच ताटात काढून घ्यावी. त्यात मीठ,
वाटलेली मीरची, हळद, हिंग, जिरं आणि चिरलेली कोथींबीर घालावी. उकड चांगली मळून
त्याचे लींबा एवढे गोळे करून घ्यावे. मोदक पात्राला तेल लावून १० ते १२ मिनिटे हया
पाऱ्या वाफवून घेणे. अशा प्रकारे निवग्र्या तयार होतील. दह्याबरोबर ह्या गरम गरम निवग्र्या छान लागतात.
Interesting ... Will try out :-)
ReplyDelete