महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवी मुंबई- माया मोरे

लहानपणापासूनच पोलीस खात्याबद्दलचा आदर व खाकी वर्दीचे आकर्षण असलेल्या सामान्य कुटुंबातील एका मुलीने आपल्या अपार कष्टाने आणि कुटुंबीयांकडून मिळालेल्या खंबीर पाठबळामुळे आपले स्वप्न कसे पूर्ण केले याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे माया मोरे. नुसतेच स्वप्न पूर्ण केले नाही तर पहिली महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवी मुंबई होण्याचा मान मिळवला. पोलिसांचा नागरिकांवर वचक निर्माण करून, पोलिसांची नागरिकांमधील प्रतिमा उंचावली; तसेच महिला चांगल्या पद्धतीने काम करू शकतात हे दाखवून दिले. खालील दिलेला त्यांचा संक्षिप्त बायोडाटा वाचल्यानंतर त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात येईलच.
व्यक्तिगत माहिती

माया हणमंत मोरे
जन्मस्थान: कराड, जि. सातारा. 
शालेय/महाविद्यालयीन शिक्षण कराड येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण  लग्नानंतर पूर्ण केले.
सामान्य कुटुंबातील एका मुलीला केलेल्या अपार कष्टामुळे व त्याला तेवढ्याच मोलाचे कुटुंबीयांचे मिळालेले पाठबळ मिळाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यास कोणतीही अडचण आली नाही. पोलीस दलाच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये एन.सी.सी. (बी) सर्टिफिकेट प्राप्त केलेले आहेत. तसेच त्या एक उत्कृष्ट क्रीडापटु (व्हॉलीबॉल) असून, त्यात त्यांनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारलेली आहे. पोलीस दलाच्या सेवेमध्येदेखील त्यांनी आतापावेतो अतिउत्कृष्ट कारकीर्द केलेली आहे. त्याकरीता त्यांना परिमंडळीय उपायुक्तांकडून वेगवेगळया पारितोषिकांनी सन्मानित केलेले आहे.

सन्मान/पुरस्कार 

1) पोलीस दलामधील उत्कृष्ट कामगिरीबाबत वेगवेगळे १४०हून अधिक पारितोषिके व प्रंशस्तीपत्र मिळालेली आहेत.
2) डी.एन.ए. पुरस्कृत नवी मुंबई डॅशिंग महिला पुरस्काराने सन्मान.
3) कन्या विद्यालय कराड या शाळेचा ’स्मृती पुरस्कार’.
4) सावित्रीच्या लेकी पुरस्कार.
5) झाशीची राणी पुरस्कार.
6) वासुदेव बळवंत फडके प्रतिष्ठानचा समाजरत्न व इतर अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत.
7) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, नवभारत, नवराष्ट्र यांचेकडून ’सुरुची स्त्रीशक्ती पुरस्कार‘ (दि.08.03.2016)
8) इवोल्व बिझनेस स्कूल यांचेकडून प्रमुख अतिथी डॉ. किरण बेदी यांचे हस्ते Women Achievement Award (दि.15.03.2016)

क्रीडा नैपुण्य

1. वेट लिफ्टींग - नॅशनल प्लेअर
2. व्हॉलीबॉल  - युनिव्हर्सिटी प्लेअर
3. खो खो व अॅथलेटीक - स्टेट प्लेअर
4. एन.सी.सी. - बी व सी सर्टीफिकेट

बृहन्मुंबई आयुक्तालयातील कारकीर्द

माया हनमंत मोरे यांनी त्यांचे नवप्रविष्ट महिला पो.उप.नि. पदाचे प्रशिक्षण हे महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी, नाशिक येथून दिनांक 15/7/1993 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केले. ह्या उल्लेखनीय सेवेमध्ये त्यांनी केलेल्या दर्जेदार व प्रशंसनीय कामगिरीचा तपशील :-  

       
1) माया मोरे यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालायाच्या अंतर्गत सन 1997-2000 दरम्यान कुलाबा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असताना तडीपारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सदर वेळी त्यांनी अनेक कुविख्यात गुन्हेगारांवरती तडीपारी व हद्दपारीसारखी प्रभावी कारवाई केली आहे. तसेच 18 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाया केलेल्या आहेत व इतर प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत. सदर कामगिरीकरीता त्यांना पोलीस दलातर्फे तत्कालीन पोलीस आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व सहा. पोलीस आयुक्त, यांनी वेगवेगळी रोख पारितोषिके व प्रशंसापत्र देऊन सन्मानित केलेले आहे.

2) सन 2000 ते 2004 या कालावधी दरम्यान त्यांनी बृहन्मुंबई आयुक्तालया अंतर्गत समाजसेवा शाखेमध्ये कर्तव्य केले असून, दरम्यान त्यांनी अनेक समाजविघातक कृत्यत्यं चालणाऱ्या अवैध धंद्यांवर (लॉटरीचे अड्डे, जुगाराचे अड्डे, पायरेटेड सी.डी., कुंटणखाने) छापे टाकून, प्रभावी कारवाई केलेली आहे. तसेच अनेक कुंटणखान्यांवरती कारवाया करून, तेथील पीडित मुलींची सुटका केलेली आहे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसनदेखील केलेले आहे. त्याबाबतही त्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित केलेले आहे. तसेच तत्कालीन मा. पोलीस आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त, व मा. सहा पोलीस आयुक्त यांनी विषेश प्रशंसापत्राद्वारे सन्मानित केलेले आहे.
3) सन 2004 ते 2006 या कालावधीदरम्यान नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई आयुक्तालय येथे कर्तव्य केले असून, या कालावधी दरम्यान वरिष्ठांचे सुचनांप्रमाणे कामकाज केले आहे.

4) सन 2006 ते 2009 या कालावधीदरम्यान त्यांची सहा. पोलीस निरीक्षक पदी पदोन्नतीवर एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाणे येथे नेमणूक झाल्यानंतर सदर ठिकाणी बिट समन्वय अधिकारी म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली असून, दरम्यानच्या कालावधीमध्ये घरफोडी, चोरी, बलात्कार, फसवणूक यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा सुनियोजीतरित्या तपास केला असून, बहुतांशी गुन्हे उघडकीस आणले. या कामगिरीसाठीदेखील त्यांना तत्कालीन परिमंडळीय उपायुक्त यांनी रोख पारितोषिके व प्रशंसापत्राने सन्मानित केलेले आहे.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कारकीर्द:-


1) सन 2009 ते 2012 या कालावधीदरम्यान माया मोरे यांची, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अशी बदली झाल्यानंतर, वाहतूक शाखेतसुद्धा पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवून नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत वाहतूक शाखा, पनवेल येथे उत्कृष्ट कामगीरी केली असून, नवी मुंबई परिमंडळ 2मधील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी वेगवेगळ्या उपाययोजना व उपक्रम राबविले आहेत. त्यात विषेशतः दारू पिऊन गाडी चालवणा-यावर जास्तीतजास्त
कारवाया केल्या, तसेच बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करून, त्यांना शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडले आहे. पनवेल वाहतूक शाखेच्या कालावधीमध्ये माया मोरे यांनी 45 हजारांहून अधिक खटले दाखल केल्याने, इतर वाहतूक शाखांच्या तुलनेत सर्वाधिक महसूल त्यांनी शासनास मिळवून दिला आहे. वाहतूक शाखेमध्ये काम करीत असताना त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे पनवेल परिसरात ‘मीटरप्रमाणे रिक्षा’ हा उपक्रम राबवला. पनवेल येथील सर्व शाळा, कॉलेजमध्ये जाऊन, वाहतुकीचे नियम पाळणे कसे फायद्याचे आहे याबाबत जनजागृती केली व त्यांच्या सदर कामाची दखल घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. गुलाबराव पोळ यांनी विशेष प्रशंसापत्राद्वारे सन्मानित केलेले आहे.


2) सन 2012 ते 2013 या कालावधीदरम्यान पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, वाशी, नवी मुंबई प्रतिनियुक्तीवर बदली झाल्यानंतर परिमंडळ 1मधील वाहतूक सुरळीत करणेकामी वेगवेगळ्या उपाययोजना व उपक्रम राबविले आहेत. वाहतूक सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी विविध कायक्रम राबविले. त्यात महीलांची हेल्मेट रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर विविध कायक्रम राबवून, जनजागृती केली. वाशी वाहतूक शाखेच्या कालावधीमध्ये माया मोरे यांनी 40 हजारांहून अधिक खटले दाखल केल्याने, इतर वाहतूक शाखांच्या तुलनेत सर्वाधिक महसूल त्यांनी शासनास मिळवून दिला आहे. वाहतूक शाखेमध्ये काम करीत असताना त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले आहे. नवी मुंबईतील इतर सर्व वाहतूक शाखांच्या तुलनेत वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या कसूरदार 40069 वाहन चालकांवर सर्वात जास्त केसेस,  तसेच सर्व वाहतूक शाखांच्या तुलनेत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 158 चालकांवर सर्वात जास्त केसेस केल्याने सदर कामाची दखल घेऊन तत्कालीन मा. पोलीस आयुक्त श्री. अहमद जावेद यांनी वेळोवेळी रोख पारितोषिके व प्रषंसांपत्राद्वारे सन्मानित केलेले आहे.

3) सन 2013 ते 2014 या कालावधीदरम्यान वाहतूक शाखा वाशी येथुन एपीएमसी पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे बदली झाल्यानंतर एपीएमसी पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 140/2013 या गुन्ह्यामध्ये सहतपासी अधिकारी म्हणुन कामगिरी केली. तसेच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाची प्रकरणे कौशल्यपूर्वक हाताळल्याने सन 2014 मध्येच त्यांची नियुक्ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाले, एमआयडीसी पोलीस ठाणे येथे झाली.


4) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत रबाले एमआयडीसी या राजकीय हस्तक्षेबाबत अत्यंत संवेदनशील अशा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणुन काम करतांताना माया मोरे यांनी अनेक कुविख्यात गुन्हेगारांवर अंकुश ठेवला, तीन महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी 310 गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कायदयान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच राजकीय वरदहस्त असलेला कुविख्यात गुंड मुक्तार अन्सारी यास अटक करून प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी केली. तसेच लोकसभा निवडणूक 2014 च्या बंदोबस्ताचे सुयोग्य नियोजन करून, बंदोबस्त पार पाडले. यामुळे पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. त्यामुळे मा. पोलीस आयुक्त व परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, यांनी त्यांचे कामाचे कौतुक करून रोख पारितोषिके व प्रशंसापत्राने सन्मानित केलेले आहे.

5) सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सौ. माया मोरे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे ते वरि ष्ठ पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस ठाणे अशी नेमणूक झाल्यानंतर आजपावेतो एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत वेगवेगळ्या चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार अशा महत्त्वाच्या गुन्हयांची त्यांनी उकल केली आहे. तसेच सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2014 चा चोख बंदोबस्त केला असल्याने त्यांना वेळोवेळी त्यांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीबाबत वेळोवेळी सन्मानित केलेले आहे. सन 2014 मध्ये सौ. माया मोरे यांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू करून, दोन गुन्हे दाखल करून, एका महिन्याच्या कालावधीमध्ये 13 आरोपींना अटक केली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये सौ. माया मोरे यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल करून मोठया प्रमाणावर गांजा या अमली पदार्थाचा साठा तसेच 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. जून 2014 पासून सौ. माया मोरे यांनी एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत, ‘स्त्रिया व बालकांसबधीचे लैंगिक अत्याचार’ या शीर्षकाखाली 5 गुन्हे दाखल केले असून, त्यातील सर्व मुख्य आरोपींना तात्काळ अटक केली आहे. तसेच त्यांचे विरुद्ध सबळ पुराव्यानिशी मा. न्यायालयात दोषरोपपत्र देखील दाखल केले आहे. 

सौ माया मोरे यांनी पोलीस दलामधील आतापर्यंतच्या सेवेमध्ये अत्यंत चिकाटीने, सचोटीने, व नि:स्वार्थीपणे त्यांचे कर्तव्य बजावले आहे. त्याचबरोबर त्यांनी बृहन्मुंबई व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील शाळा, महाविद्यालये, तसेच इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने महिला, मुली, विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्याया परीक्षांबाबत मार्गदर्शन, दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अस्तित्वात आलेला निर्भया कायदा, महिलांचे हक्क, स्वसंरक्षणाबाबत महिला, मुली व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. तसेच महिलांना त्यांचे संबधित महिला सबलीकरण करियर, महिलांचे हक्क, सेल्फ डिफेन्स या व इतर अनेक विषयांवर महिलांना व मुलींना लेक्चर दिलेले आहे.

इतर सामाजिक उपक्रम


. नवी मुंबई हद्दीतील शाळा व कॉलेजेसमध्ये वाहतूक नियमांचे जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांची माहिती दिली, तसेच चित्रफितीद्वारे प्रबोधन केले.

2. रस्ता सुरक्षा अभियान 2013 कार्यक्रमाअंतर्गत वाशी हद्दीत युवती मेळाव्याचे आयोजन करून प्रादेशिक परीवहन विभागाकडून 200 युवतींना वाहन चालवण्याचे परवाने लायसन्स वाटप केले.

3. रस्ता सुरक्षा अभियान 2013 कार्यक्रमाअंतर्गत वाशी येथे भव्य असे महिला मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करून प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेट वापरावे यासाठी जनजागृती केली. सदर रॅलीत वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी बनविलेले बोर्ड, बॅनर्स घेऊन एक हजारपेक्षा जास्त मुले/मुली तसेच शिक्षकांचा सहभाग.

4. अनेक स्क्रॅब रिक्षा पकडल्या - नवी मुंबईमध्ये पनवेल वाहतूक शाखेने प्रथम स्क्रॅब रिक्षा तोडल्या, त्यामुळे पनवेल वाहतूक शाखेचा पनवेलमध्ये दबदबा आहे.

5. अनेक शाळा व महाविद्यालयांत जाऊन वाहतुकीविषयी जनजागृती, तसेच नियम या संदर्भात मुलींशी चर्चा, पनवेल व नवीन पनवेलमध्ये नागरीकांच्या मागणीनुसार सिडको व नगरपालिका यांचेशी संपर्क साधून बोर्ड लावून घेतले. त्यामूळे वाहतूक सुरळीत होणेस मदत झाली. वाहतूक शाखेतसुद्धा पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला. विद्यार्थी व उपस्थितांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परिक्षेबाबत मार्गदर्शन, अमली पदार्थ विरोधी व्याख्याने, महिला सबलीकरण या विषयावर महिला-मुलांना मार्गदर्शन, सेल्फ डिफेन्सबाबत मार्गदर्शन केले आहे.

6. अमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधी संदर्भात फिल्म तयार केली व पथनाटय तयार केले. ते अनेक शाळा, कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी दाखवून, शाळेतील मुलांना व त्यांचे आई-वडील यांना ड्रग्ज आपल्या शरीरास कसे हानिकारक आहेत याबाबत जनजागृती करून उपक्रम राबविले. तसेच अमली पदार्थाविषयी जनजागृती अजूनही चालू आहे.

महिलांना संदेश

स्वतःला ओळखा, स्वतःमधील कार्यक्षमतेला ओळखा, आपण स्त्री-शक्ती संघटीत करू या आणि संगणक युगातील अभिनव भारत घडविण्यासाठी कटीबद्ध होऊ या. महिला आहोत याचा अभिमान बाळगू या.

Awards 





2 comments: