कविता- रिंगण


संवेदनशील मन अन् तीक्ष्ण बुद्धी, अभिमान फार फार .....
सगळेच तर आहे ठीकमग कळेना कुठे दुखतेय सुख?

स्वतंत्र विचाराचा ढिंढोरा, आयुष्य माझे माझ्या हातात......
सगळ्या आघाड्या लढेपर्यत, पाणी का आले डोळ्यांत?

मीच राणी झाशीची, दुर्गा अन् अन्नपुर्णा...
सुपरवुमन बनताना, ताठ ठेऊ किती कणा?

अंदाज हिचे परफेक्ट, प्रेझेंटेशन हिचे ऊत्तम्!
त्याच त्याच चक्रातील तीच तीच घुसमट?

बाईपणाच्या कर्तव्यासाठी करीनाने घेतलाय ब्रेक,
आकाश खुणावतेय म्हणुन ऐश्वर्याने केलाय कमबॅक!
काय करु, कुठे जाऊ, कसे भेदु हे कुंपण?

मीच तर आखलेय हे माझ्या भोवतीचे रिंगण!!!!!
                     
-- 
संजीवनी घळसासी


5 comments:

  1. Very nice Sanju. Good.. Keep it up

    ReplyDelete
  2. Really ... one is bound within ones own boundary!! Chan kavita!

    ReplyDelete
  3. रिंगणातली अवस्था छान व्यक्त केली आहे!

    ReplyDelete
  4. आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete