२०१८ चा गणेशोत्सव नेहेमीप्रमाणेच यंदाही सदाबहार
करमणुकींचे कार्यक्रम घेऊन आला. महाराष्ट्र मंडळाने या वर्षी बंगलोरला असलेल्या
विविध भागातील मराठी मंडळांना वेगवेगळे एक दशक दिले होते व त्या दशकात घडलेल्या
घटनांचा आढावा घेणारा एक तासाभराचा कार्यक्रम सादर करण्यास सांगितले होते.
मित्रमंडळ इंदिरानगरला १९७० ते १९८० हे दशक मिळाले, आणि नेहेमीप्रमाणे उत्साहाने मंडळी
कामाला लागली. मीटींग्स सुरू झाल्या आणि कच्चा आराखडा तयार झाला. प्रॅक्टिसची एकच धूम
सुरू झाली. सगळी IT वाली मंडळी आपापल्या busy schedule मधून
वेळ काढून कंबर कसून कामाला लागली.
गंधाली सेवक आणि रूपा भदे यांनी या दशकातील
राजकीय, क्रीडा, bollywood, नाटक, साहित्य
या सर्व क्षेत्रांचा आढावा घेत सर्वांगसुंदर कॅलिडिओस्कोप लिहून तयार केला. स्वप्ना, स्नेहा, रुपाली
गोखले, परेश देशपांडे अशा अनेक मित्रांनी research
मध्ये
मोलाची मदत केली.
१९७१च्या भारत – पाकिस्तान युद्धाच्या clipping
ने
कार्यक्रमाची सुरवात झाली आणि प्रेक्षक आपापल्या खुर्च्यांना खिळूनच बसले.
एकामागून एक घटना उलगडत गेल्या त्या
गंधाली आणि गांधारच्या प्रभावी संचलनाने. भारतीय नागरिकांचे विविध चेहेरे आपल्याला
गांधारने दाखवून दिले, पण त्यात ठळकपणे आपल्या नजरेसमोर आले ते निस्वार्थपणे
कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबासाहेब आमटे आणि दादासाहेब
फाळके, ज्यांची फॅक्टरी ४३३ चित्रपटांची निर्मिती
करून जगातील नंबर एकची industry बनली होती. त्या काळात आपलाच एक ठसा उमटवणाऱ्या सुधा नरवणे यांच्या आकाशवाणीवरच्या
बातम्यांची नक्कल रूपा भदे यांनी सुरेख सादर केली.
“हजारो उलझनें राहोंमें और कोशिशें बेहिसाब, इसी
का नाम है जिंदगी बस चलते रहिये जनाब!” अश्या साध्या सोप्या
भाषेत जीवनाचे ततत्वज्ञान रुपेरी पडद्याने मांडले. त्यानंतर या दशकात गाजलेली, आनेवाला
पल...., जानेमन जानेमन..., मै हूं डॉन..., चलते
चलते..., मैने
तेरे लिये ही... ही हिंदी तसेच, दडलंय काय या टोपीखाली… आणि रात्रीस खेळ चाले… यासारखी
मराठी गाणी योगेश सेवक, लीना गोखले आणि नरेन नंदे यांनी अत्यंत सुरेलपणे, प्रेक्षकांना आपल्याबरोबर ठेका धरायला
लावत एकदम ठसक्यात सादर केली. तसेच राधिका आणि नेहाने सादर
केलेल्या मराठी लावणीला भरपूर शिट्ट्या, टोप्या उडवून प्रेक्षकांनी
डोक्यावर घेतले.
याच सुमारास India is Indira and Indira is
India असे महात्म्य असलेल्या इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि
त्यांचे हे भाषण सदर केले शिल्पा नंदेने! ते इतके हुबेहूब होते कि साक्षात इंदिरा
गांधी स्टेजवर अवतरल्याचा भास झाला. त्यांच्या आणीबाणीवरील २० कलमी कार्यक्रमाला काँग्रेसचे
लोक आधुनिक गीता मानू लागले. भगवद् गीता आणि आधुनिक गीतेतील “संजय
उवाच” एवढेच साम्य मार्मिकपणे दाखवून देणाऱ्या पु. ल. देशपांड्यांच्या
प्रतिक्रियेला कडाडून टाळी झाली.
या इतिहासाच्या काळ्याकुट्ट कालखंडानंतर
मोठ्या चतुराईने विषय वळवला bollywood च्या angry young man अमिताभ
बच्चनकडे. सतत ४ वर्षे एकाच चित्रपटगृहात चाललेल्या शोलेतील खलनायक गब्बरसिंगच्या
भूमिकेत सारंग गाडगीळ फारच प्रभावी ठरले, तर हेलनचा मेहबूबा मेहबूबा dance
केतकी
वझेने इतक्या gracefully सदर केला की जाणकारांनीदेखील
तोंडात बोटे घातली.
superstar, angry young man अमिताभ
बच्चन यांचा आपल्या मिळमिळीत चिमणराव यांच्याबरोबर अत्यंत विनोदी पद्धतीने संवाद
घडला त्यावेळी सारे प्रेक्षागृह
खदखदून हसले. चिमणराव यांच्या भूमिकेत अभिजित टोणगांवकर आपली छाप पाडून गेले.
त्यानंतर स्वप्ना सोमण आणि गंधाली यांनी
संवादातून साहित्य क्षेत्रातल्या घडामोडींचा मागोवा घेतला. त्या काळात गाजत असलेले
विनोद खन्ना, शबाना आझमी, शशीकपूर, तसेच
लक्ष्मीकांत प्यारेलाल, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा
भोसले यांच्यासारखी सिनेसृष्टीशी निगडीत असलेली मंडळी तर मराठी साहित्य गाजवणारे
पु. ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, महेश एलकुंचवार आणि आपली मराठी
नाट्यभूमीही कुठेही मागे नव्हती. सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल आणि ती फुलराणी
यासारखी नाटके ही नाट्यभूमी गाजवतच होते. ज्योती घरोटेचे “ती फुलराणी”चे आवेश आणि जोशपूर्ण सादरीकरण
प्रेक्षकांची पसंती घेऊन गेले.
स्वप्ना सोमण आणि रूपा भदे या मालती बाई आणि काऊच्या
भूमिकेत अगदी चपखल बसल्या. रूपा भदेचा पुणेरी ठसका आणि चिमणरावांनी
प्रकाश पदुकोनला पाठवलेली “उज्वल
यश मिळव” अशी तार, तर त्याने यशही मिळवले आणि उज्ज्वलही मिळवली
यासारखे पंचेस प्रेक्षकांचा हशा मिळवून गेले.
याच सुमारास दूरदर्शनने भारतात प्रवेश केला. या
बातम्या सादर केल्या सीमा ढाणके यांनी. त्यात त्यांनी केलेली माश्या उडवण्याची कृती
अफलातून होती!! अजित वाडेकर आणि सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत नरेन नंदे आणि
सारंग गाडगीळ इतके perfect शोभून दिसले आणि शांता
रंगास्वामीच्या भूमिकेत स्वाती ब्रम्हे!!
या कार्यक्रमातले कलाकार बहुतांश हौशी. कलाप्रेमी
पण रंगभूमीच्या समोरून पाहणारे. अशा उत्साही मंडळींची मोट बांधणे, एक
साचेबंद, बरोबर एका तासात बसणारा कार्यक्रम तयार करणे हे दिग्दर्शकाचे
काम गंधाली सेवक यांनी स्वप्ना आणि रूपा यांना बरोबर घेत व्यवस्थित पार पाडले.
हौशी असूनही professional वाटावा असा प्रयोग तयार झाला.
बऱ्याच जणांनी एकापेक्षा जास्त भूमिका केल्या – ज्योती घरोटे यांनी सादर केलेली
कविता आणि फुलराणी, सारंग गाडगीळ यांच्या तर चार वेगवेगळ्या भूमिका; नरेन
नंदे यांचा एक गायक आणि वाडेकर; स्वप्ना सोमणांची निवेदक आणि मालतीबाई; रूपा
भदे यांनी सादर केलेली सुधा नरवणे आणि काऊ; या सगळ्यात पटपट वेशभूषा बदलून, नव्या
पात्राचे बेअरिंग घेणे हे या हौशी मंडळींनी फारच व्यावसायिक पद्धतीने केले! या
कार्यक्रमात कलाकारांइतकीच महत्त्वाची भूमिका होती ती ऑडिओ व्हिज्युअल्सची. अत्यंत
प्रोफेशनल पद्धतीने, खूप बारकाव्यांचा अभ्यास करून श्रीनिवास व भरती
सप्रे यांनी हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला.
आणीबाणी विरुद्धच्या मोर्च्यात स्फुरण चढून भारती
सप्रे, सिमरन गाडगीळ, मीनल टोणगावकर, मनीष
ढाणके हे ही सामील झाले. प्रकाश योजनेची जबाबदारी आभा जोगळेकरने सांभाळली.
कार्यक्रमाच्या दोन्ही प्रयोगांचे शूटिंग, एडिटिंग अत्यंत प्रोफेशनल
पद्धतीने मानसी सोमणने केले. नेहा सोमणने फोटोज ची जबाबदारी सांभाळली. मयुरा
वझेने वेशभूषा व रंगभूषा यात मदत केली. प्रयोगाच्या वेळी सुजय देव यांनी
केलेली मदत महत्त्वाची होती. स्नेहा केतकर आणि नीना वैशंपायन यांच्या
प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम शक्य झाला.
खरे तर ओडुकत्तुर सभागृहात ऑडिओ आणि प्रकाश
योजनेचा थोडा गोंधळ झाला, तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. पण महाराष्ट्र मंडळाच्या
सभागृहात योगेश सेवक, श्रीनिवास सप्रे व सारंग गाडगीळ यांनी जातीने आधी
सर्व व्यवस्था करून फायनल शो उत्तम होईल याची खबरदारी घेतली.
तर असा हा राजकारण, क्रीडा, विज्ञान, कला, रंगभूमी, संगीत, नाट्यभूमी, साहित्य
ह्या सर्व क्षेत्रांचा आढावा, audio visuals ची साथ, सर्वच्या
सर्व १६ कलाकारांचे उत्तम co-ordination, perfect एन्ट्री व exit,
सुस्वर
संगीत, नृत्य, विनोदी चुटके, दिग्दर्शनातील
बारकावे यामुळे कॅलिडिओस्कोप सर्वांच्या मनात अगदी घर करून गेला आणि अर्थातच पहिल्या बक्षिसाचा
मानकरीही ठरला. kudos to कॅलिडोस्कोप team!!
Superb report
ReplyDeleteThanks !!!