होड्या घेऊन
अंगणात...
शाळेला सुट्टी, मैत्रिणींशी मस्ती,
वेळ जातो एकमेकांना
भिजवण्यात!
तरुणपणी पाऊस येतो,
हुरहुर घेऊन मनी...
स्वप्नातल्या
राजकुमाराबरोबर
भिजवतो एका क्षणी!
लग्न झाल्यावर पाऊस
आणतो
आजारपणाची भीती,
मुलांसाठी Vicks, ह्यांच्यासाठी भजी,
ह्यातच वेळ जातो किती!
प्रौढपणी पाऊस
म्हणजे
गाड्या बंद, आणि धास्ती...
मुलं, सुना, नातवंड उशिरा येती,
लाईट्सही जाती!
पण... लागता नेत्र
पैलतीरी,
हाच पाऊस आणतो 'त्याची' कृपादृष्टी...
त्याच्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन घ्यावं,
आता कशाला कुणाची भीती?
आता कशाला कुणाची भीती?
----------------------------------------------------------------
सुजाता मोघे
Sundar: Keluskar
ReplyDelete