शब्दांमागची भावना

गोड शब्दांनी सारं जग जिंकता येतं असं म्हणतात! 

पण शब्दांनाच माणसाने इतकं हुशार बनवलंय की ते वरवर गोड ठेवून त्यात हवं तसं स्वार्थाचं सारंण तो भरू शकतो!
 
शब्दांतल्या सरळ आणि प्रामाणिक भावनेचा विपरीत अर्थ काढून सुंदर नातेसंबंधांची विल्हेवाट लावू शकतो...  दुर्दैवाने यामुळे स्वच्छ विचारांच्या प्रामाणिक व्यक्तींची अनेकदा परवड होताना दिसते.
 
आणि असा अनुभव आल्यानंतर आपल्याच शब्दांमधे काही इतर गर्भितार्थ तर नाही ना लपला हे ते पुनःपुन्हा तपासत बसतात...

अतिशय उत्कट भावनेने लिहिलेले शब्द उलटवून त्याच शब्दांच्या सहाय्याने विरोधाभासी चित्र सुद्धा दाखवले गेलेले दिसते...

शब्द हे जोडणे आणि तोडणे ही दोन्ही कामं लीलया करू शकतात.

म्हणूनच फक्त 'गोड बोलणेपुरेसे नसून त्या शब्दांमागची भावना प्रामाणिक असणे मला जास्त महत्त्वाची वाटतेमग शब्द आपोआपच 'गोडबनतात. खरंय ना?
 
--  
स्मिता शेखर कोरडे


2 comments:

  1. अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा हा अंक आहे.अत्यंत दर्जेदार साहित्य वाचायला मिळते. संपूर्ण टीमची मी स्मिता कोरडे व्यक्तिशः आभारी आहे.आपणां सर्वांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन ..कट्ट्यावर सदैव आपल्या बरोबर रहायला मला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete