शब्द ओळखा:
सूचना:
जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे आणि प्रत्येक शब्दातले एक अक्षर "ज्ञ" च्या बाराखडीपैकी एक आहे.
१) यांच्यामुळे आपल्याला
सभोवतालच्या वस्तुंचे ज्ञान होते : ज्ञानेंद्रिये
२) एखादी गोष्ट मनातुन जाणवणे : अंतर्ज्ञान
३) जानवे : यज्ञोपवीत
४) अपरिचित : अनभिज्ञ
५) प्रसिद्धिपत्रक, जाहिरात : विज्ञापन
६) परवानगी : अनुज्ञा
७) राणी : प्राज्ञी
८) कुतुहल, शोधक बुद्धी : जिज्ञासा
९) तीव्र बुद्धीमत्ता असलेला : प्रज्ञावंत
१०) एखादी गोष्ट करण्याचा निश्चय बोलून दाखवणे : प्रतिज्ञा
११) जाणकार : तज्ञ
१२) मराठीतील गीता : ज्ञानेश्वरी
१३) द्रौपदी : याज्ञसेनी
१४) बुद्धीमत्ता : प्रज्ञा
१५) स्पर्धात्मक परीक्षेसाठी हे असणे आवश्यक आहे : सामान्यज्ञान
क्ष, ज्ञ सारखी अक्षरे घेउन तयार केलेली कोडी म्हणजे खरंच पर्वणी आहे!!
ReplyDeleteफक्त 1 शंका आहे (I may be wrong) राणी म्हणजे राज्ञि ना? आपण प्राज्ञि दिलं आहे..
क्ष, ज्ञ सारखी अक्षरे घेउन तयार केलेली कोडी म्हणजे खरंच पर्वणी आहे!!
ReplyDeleteफक्त 1 शंका आहे (I may be wrong) राणी म्हणजे राज्ञि ना? आपण प्राज्ञि दिलं आहे..
आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteराज्ञी बरोबर आहे.
ReplyDelete