आयुष्यावर बोलू काही

सर्वसाधारणपणे प्रत्येकाची आयुष्याची पहिली २५ वर्षे अभ्यासामध्ये किंवा ज्ञानार्जनासाठी जातात, त्यानंतरची २५ वर्षे ही सगळ्यात व्यग्र, म्हणजे करियर, लग्न आणि मुले यामध्ये जातात. थोडक्यात प्रत्येक जण ५० वर्षांपर्यंत प्रपंचामध्ये गुरफटलेला असतो. तेव्हा कोणी अध्यात्मावर किंवा परमार्थाबद्दल सांगायला लागले तर असे वाटते की आपल्याला अजून हरी-हरी करायला अवकाश आहे. करू या आपण मुले सेट झाली की, रिटायरमेंट झाली की करू या...  this is not time for that... I am so busy... I have no time to eat too and moreover I am not interested in all that at this point of my life...  I want to learn so much... I want to earn lot of money  for myself and give all the comforts of this world to my children. I want to make everyone around me very happy.

थोडक्यात, प्रपंच झाला की परमार्थ करू या. तेव्हा आपल्याला भरपूर वेळ मिळेल. मग पूजापाठ, जप, वाचन जे काहीबाही करायचेय ते करू या. There will be so much free time later.असेच काहीसे माझेही परमार्थाबद्दल मत होते. माझ्याकरता संसार आणि परमार्थ ह्या दोन सेपरेट गोष्टी होत्या. प्रपंच करताना परमार्थ नाही आणि जेव्हा परमार्थ करीन तेव्हा प्रपंच झाला असेल. असे माझे माझ्यापुरते perfect planning होते. तसेही बाईच्या आयुष्यात already इतके कप्पे असतात - माहेरचा, सासरचा, नवऱ्याचा, मुलांचा, मैत्रिणींचा, समाजाचा आणि त्यात अजून एक...  परमार्थाचा? No... no I cant afford that... नकोच आता. 

प्रपंच आणि परमार्थ वेगळे नाहीत...... 

ह्याच विचारधारेवर माझेही आयुष्य सुरळीत चालले होते (असे मला वाटत होते). प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न चालू होता. कारण ते आनंदी असतील तरच मी आनंदी होणार होते. मला आदर्श आई, आदर्श बायको, आदर्श सून, आदर्श गृहिणी, करियर वूमन असे सगळे एकाचवेळी व्हायचे होते आणि त्याचबरोबर स्वतः आनंदीपण रहायचे होते. पण somehow हे आनंद प्रकरण लांबणीवर पडत चालले होते. आनंद मिळायचा पण तात्पुरता असायचा. सगळ्या फ्रंटवर यशस्वी होण्याची आणि सगळ्यांना आनंदी ठेवण्याची कसरत अवघड होत चालली होती. व्यक्तिगत आणि प्रोफ़ेशनल जीवनात येणारे प्रसंग आणि माणसे सांभाळताना दमछाक होत होती. फरफट होत होती. 

आनंद आणि समाधान ह्या गोष्टी दूरच चालल्या होत्या. आयुष्य एकसुरी झाले होते. पाट्या टाकणे सुरू होते. माझ्या नवऱ्याच्या भाषेत पहाट झाली भैरू उठला, औत घेतले, कामावर गेला, खूप दमला, झोपला, परत सकाळ झाली... असेच काहीसे झाले होते. प्रत्येक गोष्ट चालू होती, पण मनासारखे झाले नाही म्हणून राग, टोचणी, चिंता, सारखी काळजी, मनासारखे घडले नाही की खंत आणि गिल्ट अशा वेगवेगळ्या भावभावनांच्या हिंदोळ्यावर वरखाली होत होते. परिस्थितीने बदलावे, आजूबाजूच्या माणसांनी बदलावे अशा नियंत्रण नसणाऱ्या गोष्टी बदलाव्या हा अट्टाहास वाढत होता.

पण कर्मधर्म संयोगाने श्रीमदभगवतगीता ग्रंथ वाचण्याची सुबुद्धी झाली. त्याच अनुषंगाने खूप चांगल्या लोकांची पुस्तके आणि प्रवचने वाचण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. तेव्हा लक्षात आले की प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगळे नाहीत. परमार्थ करणे म्हणजे फक्त पूजापाठ, जप, वाचन, प्रवचन ऐकणे नव्हे तर परमार्थ म्हणजे आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. it’s not lifestyle change but it’s how you look at everything. Actually it’s how positively you look at everything. So it’s perspective change. 

परमार्थ म्हणजे नेमके काय?

परमार्थ म्हणजे सगळे सोडून संन्यास घ्यायचा नाही. परमार्थ म्हणजे जीवनात येणारी प्रत्येक घटना व प्रसंग यांना कसे सामोरे जायचे आणि त्यातून कसा मार्ग काढायचे हे आहे. नुसते वाचणे नाही, तर ते रोजच्या जीवनात अमलात आणणे आहे. परमार्थ म्हणजे आपण स्वतःला जास्तीत जास्त कसे आनंदी ठेवता येईल हे शिकायचे आहे, कारण आपण कुणालाही बदलू शकत नाही, परिस्थिती आणि माणसेही. प्रत्येक प्रसंगामध्ये काही घटक आपल्या 

नियंत्रणाखाली असतात तर काही नियंत्रणाबाहेर असतात त्यातला फरक समजून घेणे. परमार्थ आपल्याला आपले जीवन कसे manage करायचे हे शिकवतो. परमार्थ आपल्याला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय आणि जीवन कसे उन्नत करायचे हे शिकवतो. परमार्थ आपल्याला आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट भावभावनांचे दायित्व घ्यायला शिकवतो. प्रसंग येत राहणार, माणसेही तशीच वागणार पण त्यात मी कसे रिस्पाँड करते ह्यावर माझा आनंद अवलंबून आहे. 

परमार्थ म्हणजे निष्क्रियता नाही, तर प्रत्येक काम उत्साहाने आणि आनंदानी कसे करायचे हे शिकवतो. परमार्थ म्हणजे भावनाशून्य व्हायचे नाही, तर उलट संवेदनशील राहूनही स्ट्राँग व्हायचे हे शिकवतो. थोडक्यात, परमार्थ हा आपल्याला जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिव्हिंग) शिकवतो. पण हेच जर मला वयाच्या ७० व्या वर्षी कळले तर मी ते कधी शिकणार आणि कधी वापरणार??? विचार करा...

मंजिरी सबनिस

3 comments:

  1. अतिशय सोप्या भाषेत परमाथ म्हणजे काय आणि प्रपंचात राहून सुध्दा तो करता येतो, हे समजले.

    ReplyDelete
  2. अतिशय छान मांडलेत विचार. खरंच आहे , हे विश्व किती छान आहे हे माहीत नसतं दैनंदिन कामाच्या रामरगाड्यात. पण एकदा या विश्वाची ओळख झाली की आयुष्य बदलतं की नाही माहित नाही , पण सोप्पं होतं, सहज होतं , आहे ते स्वीकारून आनंदाने राहणं जमू लागतं. खूप ओघवत्या भाषेत हे सर्व मांडलं आहे आपण. अभिनंदन.

    ReplyDelete