सध्या Whatsappवर ‘“मुलं पण तर परकी होतात”’ अशी एक कविता प्रचलित होते आहे.
ती वाचली आणि मनात विचार आले की अरे मुली जशा माहेरी येतात तशी मुलं पण तर
माहेरी येतात.
माझा स्वत:चा अनुभव मी ह्या कवितेद्वारे लिहिला आहे.
कोण म्हणतो फक्त मुली माहेरी येतात?
मुलं पण तरी माहेरी येतात!
त्याच्या येण्याची चाहूल लागताच माझं मन अधीर होणं
आल्यापासून त्याचं आई आई करत माझ्या मागे फिरणं
college च्या/Hostel च्या गप्पागोष्टी
सांगणं
माझं “तुला खायला काय करू’’ असं सारखं विचारणं
“अगं इतक्या दिवसाचं काय चार दिवसांत खायला घालतेस का?”
असं त्याचं कौतुकाने रागवणं
लाडू चिवड्याचे डबे उघडत, “बस की किती फराळ बनवशील?”
असं त्याच विचारणं.
प्रत्येक वेळी तो जाताना माझे डोळे भरून येणं
“परत कधी रे?’’ असं म्हणत त्याच्या डोळ्यात पाहणं
‘‘राहिल्यासारखा वाटलंच नाही’’ हे म्हणणं
आणि एकदम आपली आई पण नेहमी हेच का म्हणते
ह्याच अर्थ मला उमजणं...
म्हणूनच म्हणते, मुले पण तर माहेरी येतात
कोण म्हणतं फक्त मुली माहेरी येतात!
अगदी सहज,सोप्या शब्दात लिहिलेली ही कविता मनाला स्पर्शून गेली. विचारही मार्मिक आणि हल्लीच्या जगात एकदम परफेक्ट !
ReplyDelete