5th June Environment Day |
संपादकीय
आज १ जुलै! खरं तर जुलै महिन्यापर्यंत दक्षिण भारतात पाऊस
पोचलेला असतो. नुसता पोचलेला नाही तर कोसळत असतो. पण ह्या वेळी जून महिना संपला तरी पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे हे जाणवत
आहे सगळ्यांना!
म्हणूनच ह्यावेळी आपण कट्ट्याचे मुखपृष्ठ पर्यावरण दिन, जो ५ जूनला
असतो, त्यावरील केले आहे. गेल्या वर्षी केपटाऊन या दक्षिण आफ्रिकेतील शहरातील पाणी
संपले होते. ह्या वर्षी अशीच स्थिती आपल्या शेजारच्या चेन्नई शहराची झाली आहे. आजच
पेपरात आलेल्या बातमीनुसार बंगलोर येथे आता अधिक घरे बांधण्यावर बंदी आणण्याचा
विचार सरकार करीत आहे. कारण एकच, पाण्याची कमतरता!!!!
हा बिघडलेला पर्यावरणाचा समतोल अजून काय भीषण रूप घेतो हे
देवच जाणे! म्हणून ह्या कट्ट्यात आम्ही या विषयावर काही चिंतनशील लेख-कविता दिल्या
आहेत.
'शब्दसुरांच्या जगात' ह्या लेखमालेतील हा शेवटचा लेख जरूर
वाचा आणि ऐका. ग्रेस यांची कविता ही शब्दातून आणि सुरांतून मनावर कसे गारुड करते ते
अनुभवा. गेले वर्षभर प्रवराने दिलेल्या ह्या शब्द-सुरांच्या खजिन्यासाठी तिचे
मनापासून धन्यवाद.
बदलत्या काळाचे चित्र वृद्धाश्रम ह्या लेखातून दिसते.
रवींद्रनाथांच्या कवितेचे रसग्रहण वाचकांना नक्कीच आवडेल. नेहमीप्रमाणे जीवनाच्या
विविध पैलूंना स्पर्श करणारे साहित्य कट्टा वाचकांना देण्याचा प्रयत्न केला आहे.
रसिकांच्या प्रतिसादाची अपेक्षा जरूर आहे.
पुढील महिन्यात 'कृष्णाष्टमी' आहे. कृष्ण म्हटले की अनेक रुपे, अनेक भावना जाग्या होतात मनात. तुम्हांला काय आठवते? आम्हांला लिहून पाठवा.
पुढील महिन्यात 'कृष्णाष्टमी' आहे. कृष्ण म्हटले की अनेक रुपे, अनेक भावना जाग्या होतात मनात. तुम्हांला काय आठवते? आम्हांला लिहून पाठवा.
मध्यंतरी एक कविता वाचली होती. "प्रत्येकाच्या आयुष्यात एक कृष्ण असायला
हवा" अशी कोणी व्यक्ती आहे का तुमच्या आयुष्यात?
कृष्ण आणि तुम्ही यांचे नाते लिहून पाठवा
कट्ट्यासाठी. मग लेख असो, कविता असो
किंवा तुमचे विचार असो...
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका:
me@environment : सोनाली रसाळ
रसग्रहण : मंजिरी सबनीस
वृद्धाश्रम काळाची गरज: कांचन देशमुख
---------------------------------------------------------------------------
क्षण : स्नेहा विरगावकर
मायमराठी : वैशाली वर्तक
दो कविताऐं : अनिता मराठे
----------------------------------------------------------------------------
शब्द सुरांच्या जगात : प्रवरा संदीप
मधले पान : स्नेहा केतकर
सती : मानस
----------------------------------------------------------------------------
GBS-१०-घरवापसी: आशीर्वाद आचरेकर
पालकत्व-१०- गप्पांचा श्रीगणेशा: प्रीती ओसवाल
आम्रभात : श्वेता मोघे साठ्ये
कैलाशपरिक्रमा : अभिजित टोणगावकर

No comments:
Post a Comment