मित्रमंडळ गणेशोत्सव अहवाल



संपन्न महाराष्ट्र सांगे नाते,शौर्य,परंपरा,संस्कृतीचे
नाही मराठीला बंधन,कुठल्या सीमारेषा वा प्रांताचे

आलो आपण दक्षिणेतल्या आधुनिक बेंगलोर शहर,
निमित्त आपले असे शिक्षण,व्यवसाय किंवा नोकरी

जरी असे इथून दूरवरी आपल्या मायेची मराठी माती
भेटूनी बोलूया,जोडूया आपल्यात नव्याने नातीगोती

गणरायाची चतुर्थी असो वा शिवरायांची जयंती
सण समारंभ सारेच इथे सगळे उत्साहाने करीती

वारसा जपुनी मराठीचा एकत्र इथे भिन्न प्रांताशी
समरूप होऊया सारेच बेंगलोर मित्रमंडळाशी    

1 comment: