आमच्या प्रत्येक वाचकात एक लेखक दडलेला आहे असा आमचा विश्वास आहे. त्या
लेखकाला बाहेर आणण्याचे आमचे नेहेमीच प्रयत्न असतात. तिळगुळ आणि मैत्री – संक्रांति
निमित्त आम्ही केलेल्या ‘तुमचे विचार लेखात शब्दबद्ध करून आम्हाला पाठवा’ या आमच्या
आवाहनाला अगदी ‘उदंड जाहले पाणि ...’ असा जरी नाही तरी उत्साही प्रतिसाद सात वाचकांकडून
मिळाला. त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार.
वर उत्साही असा शब्द वापरला आहे, कारण डिसेंबरचा अंक प्रकाशित झाल्यावर
पहिल्याच आठवड्यात आलेले हे लेख आहेत. (याचा अर्थ; नंतर काही
लेख प्रतिसाद नाही असाही होतो; पण आम्ही त्याकडे सोयिस्करपणे
दुर्लक्ष करतो!)
फेब्रुवारी अंकात “माझे पहिले प्रेम” या संकल्पनेसाठी
आम्ही लेख मागवत आहोत. त्याला यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. संत
Valentine यांचा प्रकटदिन १४ फे.ला
साजरा होतो. त्यानिमित्त ही धडपड आहे. मैत्री या विषयावरचे खालील लेख जरूर वाचा. त्यावर
अभिप्राय नक्की लिहा; तिळगुळाच्या त्या गोडीच्या प्रभावात असतानाच,
आपल्या पहिल्या प्रेमाची कहाणी एकटाकी लिहून काढा, आम्हाला ईमेलने पाठवा. आम्ही ती प्रकशित करून सुफळ संपूर्ण करू, ही खात्री ...
-
कट्टा, संपादक समिती
No comments:
Post a Comment