कट्टा - एप्रिल २०१७


अनुक्रमणिका 
(वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)
पसारा- वैशाली वर्तक

नमस्कार मंडळी
आमच्या मार्च महिला दिन विशेषांकाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. आमच्या कट्ट्याच्या पेज हिट्स १३,५०० पर्यंत पोचल्या. आम्हाला तुम्ही मेल आणि मेसेजद्वारे विशेषांक आवडल्याचे आवर्जून कळवलेत त्याबद्दलही धन्यवाद. आपले प्रेम असेच वाढत राहो.

ह्यावेळी आम्ही कथा, लेख, कविता, गाणे, पेंटिंग, फिल्म परीक्षण, जीवन अनुभव आणि प्रवास वर्णन असा गुलदस्ता घेऊन आलो आहोत. 'वेगळी वाट' या सदरात या वेळी आपण संतृप्ती राजनकर हिची माहिती करून घेणार आहोत. मित्र मंडळाचे आधारस्तंभ श्री. राजनकर आणि सौ. कुमुदताई यांची ती मुलगी. तिने पत्रकारिता हे क्षेत्र निवडले. गेली वीस-बावीस वर्षे या क्षेत्रांत ती काम करत आहे. संगणकीकरणाच्या आधीचा आणि नंतरचा ही काळ तिने अनुभवला. या सर्व दृष्टीने बदलत्या क्षेत्रातले तिचे अनुभव आज ती सांगत आहे. हा अंक कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही ब्लोगवरही लिहू शकता. सर्व लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिक्रिया त्यांच्या लेखाखाली असलेल्या कोमेंट बॉक्स मध्ये लिहा. मे महिन्यासाठी आम्ही अजून एक थीम घेऊन येणार आहोत त्याची माहिती लवकरच कळवू.

आपली 
मित्रमंडळ कट्टा समिती 2016
मंजिरी विवेक सबनीस- संपादक व ब्लोग संयोजक
स्नेहा केतकर - सहसंपादक  रश्मी साठे - मुद्रित शोधक
गंधाली सेवकरूपा भदेरुपाली गोखले व राधिका बागुल

No comments:

Post a Comment