जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, मार्च
महिन्याचा मित्रमंडळ कट्टा अंक स्त्री शक्तीला अभिवादन करणारा आहे. आम्ही अशाच काही स्त्रियांबद्दल माहिती दिली,
ज्यांना नव्या वाटांनी खुणावले.
अनुक्रमणिका
जय दुर्गे दुर्गती परिहारिणी- ज्योती कुलकर्णी
First Women Surfer in India - Ishita Malviyaस्त्रीशक्ती मानवंदना
नमस्कार मंडळी,
जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने, मार्च महिन्याचा मित्रमंडळ कट्टा अंक स्त्री शक्तीला अभिवादन
करणारा आहे.
हेन्री डेव्हीड
थोरो याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे.
'If a man does not keep pace with
his companions, perhaps it is because he hears a different drummer.'
या महिला दिनानिमित्त आम्ही अशाच काही स्त्रियांबद्दल माहिती देणार आहोत,
ज्यांना नव्या वाटांनी खुणावले.
आपल्या सर्व भारतीयांना ज्याचा अभिमान आहे त्या 'इस्त्रोने' १०४ उपग्रह एकाच
वेळी सोडून जागतिक विक्रम केला. पूर्णपणे पुरुषप्रधान असलेल्या ह्या फिल्डमध्ये अनुराधा
टी.के यांनी स्वतःचा ठसा उमटवला.
काहींना आपण काही नवं करत आहोत हे माहितीच नव्हतं. जशी इशिता मालवीय!
आवड म्हणून ती सर्फिंग शिकली. ती भारतातील पहिली वूमन सर्फर आहे हे तिला नंतर
कळले. आता ती या खेळाचा प्रसार करते.
पोलीस खात्यात काम करणाऱ्या माया मोरे! समाजासाठी काम करण्याची इच्छा
असणाऱ्या प्राची गुर्जर. त्यांच्या या आवडीतूनच त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा
मिळाली.
अनुराधा गोरे आणि डॉ. शुभांगी तांबवेकर या दोन आया. कुणावर येऊ नये असा प्रसंग
त्यांच्यावर आला. पण हे दु:खच त्यांच्या जगण्याला नवी दिशा देऊन गेलं. दु:खातूनच
त्यांनी प्रेरणा घेतली आणि समाजासाठी काहीतरी करण्याचं त्यांना बळ मिळालं.
अनुराधा कोईराला या नेपाळमधून देशोदेशी विकल्या जाणाऱ्या मुलींच्या पुनर्वसनाच्या कामात
गुंतल्या आहेत. त्या एकट्या या व्यवस्थेविरुद्ध मोठा लढा देत आहेत.
हेब्बार किचनची अपर्णा आणि मैत्रीण डॉट कॉमची भाग्यश्री
कुलकर्णी-करकमकर ह्यांनी नवीन
तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातल्या मुलींना आणि बायकांना सोशल मीडियातून जवळ आणलं.
आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांवरही उपनयन संस्कार
केला जायचा, पण ही प्रथा लुप्त झाली होती. पण त्याच प्रकारे केला जाणारा ज्ञानप्रबोधिनीचा विद्याव्रत
संस्कार अत्यंत कौतुकास्पद!
सगळ्या मैत्रिणीनी मिळून एकमेकिंकरता फ्रेंडशिप गिफ्ट म्हणून केलेले नाटक
'सेल्फी'. नवीन आशय आणि नवीन विषय असलेले हे मैत्रिणींचे नाटक. लेखिका आणि कलाकार
म्हणून शिल्पा नवलकर यांचे कौतुकास्पद प्रयत्न.
बायोमास वापरून रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याच्या क्षेत्रात उतरलेली
नव-उद्योजिका अपर्णा गोंधळेकर हिचा प्रवास आणखी वेगळ्या वाटेवरचा!
'स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास' सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत जनाबाईंनी तमाम स्त्रीवर्गाला एक दिलासा दिला होता.
आजकालच्या स्त्रियांच्या कार्यक्षमतेचं क्षितीज बघता समस्त स्त्रीवर्गानी संत
जनाबाईच्या आश्वासनातून प्रेरणा घेतली आहे .
स्त्रीची ही सारी रूपं आम्हाला नवरात्रातील देवी इतकीच पूजनीय वाटतात. म्हणूनच
स्त्री-शक्तीला हा मानाचा मुजरा!
आपली
मित्रमंडळ कट्टा समिती 2016
मंजिरी विवेक सबनीस- संपादक व ब्लोग संयोजक
स्नेहा केतकर - सहसंपादक व रश्मी साठे - मुद्रित शोधक,
गंधाली सेवक, रूपा भदे, रुपाली गोखले
व राधिका बागुल
No comments:
Post a Comment