अनुक्रमणिका
लेख
कविता
नमस्कार मंडळी,
आपल्या कट्ट्याचा हा चौथा अंक ! दिवाळी, थंडी आणि गोड बोलणे अशा विषयांवर पहिले दोन-तीन अंक काढले होते. या अंकात मात्र असा कोणताच खास विषय दिलेला नाही. असे असले तरीही सर्वांना आवडणारे अनेक विषय यात आहेत. यावेळी मनाला आवडणाऱ्या अनेक विषयांवर आपल्या मैत्रिणींनी लिहिले आहे.
नवीन वर्षात अनेकांनी नवीन संकल्प केले असणार. त्यातील एक संकल्प हा कट्टा वाचण्याचा आणि त्यातील लेखकांना प्रोत्साहन देण्याचा करावा ही आमची आग्रहाची विनंती.
या अंकात वेगळ्या वाटेने चालणाऱ्या अमोघ वैशंपायनची मुलाखत आहे. वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणांचा आपणच उत्साह वाढवला पाहिजे.
येणारे दोन महिने परीक्षांचे आणि अभ्यासाचे असणार आहेत. सर्व विद्यार्थांना खूप साऱ्या शुभेच्छा!
तर मंडळी, आमच्या कट्ट्यावर जरूर या आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका तसेच तुमच्यापैकी कुणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, व्हिडीओ हे कट्ट्यावर यावे असे वाटत असतील तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.
आपलीच,
मित्रमंडळ कट्टा २०१६ समिती
मंजिरी सबनीस- संपादक आणि ब्लोग संयोजक,
स्नेहा केतकर- सहसंपादक, रश्मी साठे- मुद्रित शोधक
गंधाली सेवक, रूपा भदे, रुपाली गोखले व राधिका बोरसे
या अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.
No comments:
Post a Comment