कट्टा - डिसेंबर २०१८

(c) नीना वैशंपायन 

दिवाळीच्या धामधुमीतून उसंत मिळाल्यावर वाचकांनी कट्टा वाचला असेल अशी आशा आहे. या महिन्यात खास नैमिषारण्यावरील एक लेख देत आहोत. या पौराणिक ठिकाणी आज गेल्यावर कसे वाटते ते जरूर वाचा. या जागेची महत्व चारी युगांत होते ते ही वाचायला मिळेल. कैकेयी कथेतून एक वेगळा विचार मांडला आहे .


कट्ट्यावरील जुन्या मुलाखतीही आवर्जून वाचल्या जातात असे जाणवले. मात्र कॉमेंट नोंदवण्याची सोय असूनही बरेचजण मते नोंदवित नाहीत असे आढळले आहे. फोनवर बोलताना वा गप्पा मारताना मात्र काय आवडले ते सांगतात.

Me too  वरील  लेखही अनेकांनी वाचले. हा मुद्दा वाचकांपर्यंत पोचवण्याचा हेतू साध्य झाला असे वाटले.

'मधले पान' या लेखात सामाजिक, राजकीय वा कलेच्या क्षेत्रांत घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेण्यात येईल.

शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर एक बदल कट्ट्याच्या संपादकीय मंडळात सुद्धा होतो आहे. कट्टा आपल्यासमोर आणण्यासाठी स्क्रीन मागे कार्यरत असणाऱ्या वैशाली अकोटकर आणि राजश्री पैठणे यांनी या कामातून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. त्यांच्या आजपर्यन्तच्या कामाबद्दल कट्ट्यातर्फे मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते. याच बरोबर वाचकांपैकी कोणाला, कट्ट्याची ही तांत्रिक बाजू सांभाळण्याची ईच्छा असेल, तर आमच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करते.  

कट्ट्यावरून मनमोकळे लिहिण्यासाठी, स्वतःचे विचार मांडण्यासाठी आम्हांला जरूर संपर्क करा. ह्या वेगवान जीवनात विसाव्यासाठी, नव्या विचारांसाठी  कट्ट्यावर जरूर विश्राम घ्या.  
स्नेहा केतकर
३० नोव्हेंबर २०१८

अनुक्रमणिका
संपादकीय 
कैकयी – मीनाक्षी टोणगांवकर
मधले पान - स्नेहा केतकर
-------------------------------------------------------------------------------------------
आई पालक - पालकत्व   - प्रीती ओसवाल
GBS एक अनुभव       -   आशीर्वाद आचरेकर 
चुरम्याचे लाडू           -     सौ. श्वेता अनुप साठ्ये  
------------------------------------------------------------------------------------------------
आठवणी  - अंजली टोणगांवकर
शब्दसुरांच्या जगात - गझल - प्रवरा संदीप
काय हवंय मला  - प्रज्ञा वझे घारपुरे 
------------------------------------------------------------------------------------------------
Xmas gift   - मानस
सेवा कॅफे      - नवीन काळे 

No comments:

Post a Comment