कट्टा- मे २०१९



संपादकीय

देशातील  राजकीय वातावरण निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे तापलेले असताना कट्ट्यावर आम्ही हा मे महिन्याचा अंक घेऊन येत आहोत. नियमित लेखन करणे अवघड खरेच - पण कट्टा या बाबतीत सुदैवी आहे. आमच्या चालू असणाऱ्या लेखमालांमधली पुढली पुष्पं याही अंकात तुम्हाला दिसतील.

या आमच्या नेहेमीच्या लेखकांबरोबरच डॉ. घारपुरे, अनुजा मंदार आणि वैशाली वर्तक या तीन नवीन लेखकांनी या अंकातून कट्ट्यावर पदार्पण केले आहे. त्यांचे हात असेच लिहिते राहतील अशी अपेक्षा आहे.

या अंकाचे मुखपृष्ठ सतीश कर्वे यांनी काढलेले जलरंगातील चित्र आहे - एप्रिल महिन्यात झालेल्या रामनवमीची आठवण करून देणाऱ्या ह्या सुंदर चित्राबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

एप्रिल महिन्यात (२३ एप्रिल) जागतिक पुस्तक दिवस असतो. पुस्तकांचे वाचन वाढावे यासाठी प्रयत्न करणारा हा दिवस. या अत्यंत स्तुत्य उपक्रमात - या अंकाच्या निमित्ताने कट्ट्याचा खारीचा वाटा.

कट्ट्याचा पुढचा अंकात मुलामुलींनी लिहिलेले साहित्य, त्यांनी तयार केलेले व्हिडीओज, चित्रं, फोटो, कोडी, जोक्स - अशा गोष्टींना प्राधान्य द्यायचे आहे. तुमच्या आसपासच्या उत्साही मुलामुलींना या वेगळ्या उपक्रमात सामील व्हायला प्रेरित करा. जून महिन्याच्या खास बाल-विशेषांकासाठी त्यांच्या फोटोसकट ही माहिती पाठवा. 'बाल-विशेषांकासाठी' असे मात्र मेलमध्ये जरूर नमूद करा.


आमचा MAIL ID आहे:   mitramandalkatta@gmail.com


अभिजित टोणगांवकर


अनुक्रमणिका:

मेकिंग ऑफ सुपरहिरो:                  - अनुजा मंदार
उन्हाळा:                                   -  वैजयंती डांगे
**************************************************************
शिवजयंती सोहळा:                      - अनिकेत जोशी
पुस्तक दिनानिमित्त:                     -  डॉ. मधुकर त्र्यम्बक घारपुरे
आनंदी गोपाळ!!:                         -  रवींद्र केसकर
**************************************************************
हेमदुग्धकदलिका शिकरण:              - सौ.श्वेता अनुप साठये
मधले पान:                                - अभिजित टोणगांवकर
GBS प्रकरण ८वे – वॉर्डमध्ये:        - आशिर्वाद आचरेकर
**************************************************************        
आई:                                         - मेघना भावे तत्त्ववादी
Artificial Intelligence:               - मानस 
सुपरवुमन का सुपरआई?:               - प्रीती ओ.
माय मराठी:                                - वैशाली वर्तक
**************************************************************
मैं तो खेलुन्गी:                             - संदीप लिमये
केनियातील प्राणी:                       - अनघा बोडस 

No comments:

Post a Comment