कट्टा- एप्रिल २०१९


संपादकीय

सर्व वाचकांना कट्टा टीम तर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!
उन्हाळ्याने 'मी' म्हणायला सुरवात केली आहे. आता पन्हे, थंड ताक, शहाळ्याचे पाणी याची आठवण होऊ लागली आहे. मार्च महिना बंगलोरमध्ये नेहमीच खूप गरम असतो. एकूणच ह्या महिन्यात मुले-पालक सगळेच परीक्षांमध्ये व्यस्त असतात. तरीही आपला कट्टा मात्र रंजक लेखांनी सजला आहे. पाडव्यावरील खास लेख, पाडव्यावरील खास गाणे आहे.

आपला हा वर्षारंभ!!! कडक उन्हाबरोबर फळांच्या राजाला घेऊन येणारा!!!!!! या महिन्यात केनियातील पक्ष्यांवर एक सुंदर फोटो फिचर देत आहोत. दर महिन्याला असे फोटो फिचर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेहमीची सदरे आणि लेख असतीलच, पण कट्टाच्या दृक्श्राव्य सोयीचा पुरेपूर वापर करण्याचा आमचा यापुढे प्रयत्न असेल.
ह्या कट्टा अंकाचे मुखपृष्ठ अंजली गाडगीळ यांनी doodle art चा वापर करून काढले आहे. अनेकजण आपणहून ह्या ना त्या निमित्ताने 'मित्रमंडळ कट्टा'शी जोडले जात आहेत याचा खूप आनंद वाटतो.
आपल्यालाही ह्या कट्ट्यात सहभागी व्हायचे असेल, काही बदल सुचवावेसे वाटत असतील तर जरूर आम्हाला मेल करा.

स्नेहा केतकर

 अनुक्रमणिका:

**********************************
**********************************
**********************************
**********************************
**********************************

No comments:

Post a Comment