कट्टा -फेब्रुवारी २०२०

अपर्णा चेरेकर 
संपादकीय
नवे वर्ष मोठ्या उत्साहात सुरु झाले पण वर्ष संपता संपता कुशल पंजाबी या अभिनेत्याची आत्महत्या आपल्या सगळ्यांनाच अंतर्मुख करून गेली. अनेकांनी सोशल मिडियावर ह्या विषयावर आपले मनोगत ही व्यक्त केले. मानसिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे आणि ते प्रयत्नांनीही कसे राखता येऊ शकेल हे वाचा 'मन करारे प्रसन्न' ह्या लेखात.
कट्टा वाचकांना संक्रांतीच्या शुभेच्छा!!! गुळाचा गोडवा आपल्याही आयुष्यात कायम राहावा ही सदिच्छा!!! आपले जीवन कायम असेच आनंदी राहावे असे वाटत असेल तर जपानी लोकांनी जोपासलेली जगण्याची रीत काय आहे हे जाणून घ्या 'इकिगाई' ह्या लेखातून. ट्रेंड ह्या कथेत वाचा तुमची-आमची सगळ्यांचीच गोष्ट.
महानगराच्या कहाणीचा दुसरा भाग ही तितकाच रंजक आहे. 'एक गाँव की कहानी' मध्ये दुसऱ्या महायुद्धात एक गावच्या गावच कसे संपवले गेले ह्याची अंगावर काटा आणणारी हकीकत वाचा.
आपल्याला परत एकदा 'हायकू' कविता प्रकारची आठवण करून देत आहोत. 'निवांत' ही कविता मात्र आपल्या आयुष्यातल्या अनुभवावर लिहिली आहे. खास करून मैत्रिणींना ती खूप आवडेल.
याशिवाय नेहमीची सदरे आहेतच. समुपदेशन, पालकत्व ही सदरे अनेकांना भावतात असे आढळून आले आहे. माहिती आणि मनोरंजन कट्ट्यातून व्हावे  असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तेव्हा कट्टा स्वतः वाचा आणि आपल्या मित्रपरिवाराला ही जरूर पाठवा.
तुमची मते जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. 
त्यासाठी mitramandalkatta@gmail.com वर mail पाठवा.   

स्नेहा केतकर
अनुक्रमणिका

युवराज शहा 
लेखमाला - भाग ५




डॉ स्वप्नाली धांदर 
रत्ना गोखले 
मानस 

अनिता मराठे 
शुभदा पाठक 
स्नेहा केतकर 

अलका देशपांडे 
ज्योती कुलकर्णी 
डॉ.दिलीप कानडे
प्रीती ओसवाल
दिनेश शिंदे 
डॉ पूर्वा रानडे  


नरेन साठ्ये 









No comments:

Post a Comment