कट्टा-जानेवारी २०२०


संपादकीय
आज २०२० चा पहिला कट्टा आपल्या हाती देत आहोत. कट्ट्याचे मुखपृष्ठ आपली मैत्रीण श्वेता मोघे-साठ्ये हिने केले आहे.
ह्या कट्ट्यापासून आपली एक मैत्रीण अलका देशपांडे ही 'गीताई' ह्या विनोबा भावे यांनी लिहिलेल्या मराठी गीतेचा भावार्थ सांगणार आहे. हा भावार्थ वाचता वाचता गीतेचे सार थोडेतरी आपल्या मनात उतरावे ही आशा.
आपल्या दिवाळीच्या खाऊत दिवाळी अंकांचा समावेश असतोच. अशाच आवडलेल्या दिवाळी अंकाबद्दल लिहिले आहे वृंदा जोशी हिने. 'टीम निवांत - अंधत्वावर मात' ह्या पुस्तकाचे परिक्षण जरूर वाचा. अनेकांना प्रेरणा देईल असे हे पुस्तक आपल्यापर्यंत पोचवले आहे मीरा धाराशिवकर यांनी.
मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंकाअसे या महानगराचे वर्णन शाहीर पठ्ठे बापूराव यांनी केले होते. ह्या महानगराच्या विकासाची गोष्ट सांगितली आहे युवराज शहा यांनी.

"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर ,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया"

ह्या मजरूह सुलतानपुरी यांच्या प्रसिद्ध शेराप्रमाणे हे सगळे लेख आपल्या मित्रपरिवारातील उत्साही मित्र मैत्रिणींनी खास कट्ट्यासाठी दिले आहेत.
गणपती उत्सवाच्या वेळीच आपल्याला सोडून गेलेल्या पद्माताई साठे यांच्याविषयी लिहिले आहे त्यांच्या काही मैत्रिणींनी.
याशिवाय वाचा पर्सेपोलीस ह्या इराणमधील सम्राट दारियुशने बांधलेल्या राजधानीबद्दल.
सोबत आपली नेहमीची सदरे आहेतच. कट्ट्यात दरवेळी नविन काही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. येत्या वर्षात अशा नव्या लेखकांची-वाचकांची साथ मिळेल अशी मनात आशा आहे.
येणारे नवे वर्ष कट्टा लेखक-वाचक परिवाराला आनंदाचे, सुखासमाधानाचे जावो ही इच्छा. 
आमची Mail id आहे 'mitramandalkatta@gmail.com'


स्नेहा केतकर

अनुक्रमणिका


स्नेहा केतकर
युवराज शहा
वैविध्यपूर्ण दिवाळी अंक 

वृंदा जोशी
वृंदा जोशी
पद्माताई- काही आठवणी...

सरोज घोरपडकर
आरती रानडे


मीरा धाराशिवकर
मानस
स्नेहा विरगावकर
स्नेहा केतकर


अलका देशपांडे

ज्योती कुलकर्णी 

डॉ. दिलीप कानडे 

प्रीती ओसवाल

दिनेश शिंदे 
डॉ . पूर्वा रानडे 


लेख स्पर्धा
अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर भारत
फोटो फीचर                                               

अजय रिसबूड  
समीक्षा घरोटे
 प्रतिसाद कट्टा डिसेंबर २०१९ 

No comments:

Post a Comment