(c) राधिका बागुल |
संपादकीय
नव्या वर्षी आपणांसाठी चांगले साहित्य देण्यासाठी कट्टा टीम उत्साहाने तयार झाली आहे. कट्ट्यात वाचकांचा अधिक सहभाग असावा, ही आमची मनापासूनची इच्छा आहे. तुम्ही वाचकांनीही ही इच्छा पूर्ण केली आहे. #me too movement, तिळगुळ-मैत्री आणि आता प्रेम या विषयांवर रसिकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोणत्याही घटनेचा सारासार विचार करणे, त्यावर आपले मत बनवणे आणि निर्भीडपणे ते मांडणे हे सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. यासाठीच विविध विषय आपल्यापर्यंत पोचवण्याचा कट्टा टीमचा प्रयत्न असतो.
आपला कट्टा हा ब्लॉग स्वरूपात असल्यानेही आपल्याला खूप स्वातंत्र्य मिळते. कारण आपण यात audio, video clip, चित्रे अशा अनेक गोष्टी घालू शकतो. मित्रमंडळाने सादर केलेल्या 'आम्ही आणि आमचे बाप' या कार्यक्रमातले प्रसिद्ध कलाकार आनंद इंगळे व सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजित परब यांच्या मुलाखतींचे videos, कट्टा वाचकांसाठी देत आहोत. रसिकांच्या प्रतिसादाचा video ही लेखात देण्यात आला आहे.
या महिन्यात आपण एक फोटो फिचर खास कट्टा वाचकांसाठी देत आहोत. 'चित्र संथे' हा चित्रकला परिषदेचा एक स्तुत्य उपक्रम. या महोत्सवावर फोटो फिचर आम्ही देत आहोत. बघा आवडतंय का! आणि आम्हांला जरूर कळवा.
तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ही लिहिण्यासाठी नवा विषय देत आहोत. तर मग आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहोत.
आमचा ईमेल id: mitramandalkatta@gmail.com
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका:
विनंती विशेष - कट्टा टीम
---------------------------------------------------------

चित्र संथे २०१९ - Photo Feature
No comments:
Post a Comment