(c) मंजिरी सबनीस |
संपादकीय
पाहता पाहता
२०१८ साल संपत आले. वर्ष संपताना आणि नवे वर्ष सुरु होताना, सगळ्यांच्याच मनात अनेक
भावना असतात. आनंद, समाधानाच्या किंवा वर्ष खूप कठीण गेले असेल तर सुटल्याच्या!!! नव्या
वर्षाचे स्वागत मात्र आपण सारे नव्या उत्साहात करतो.कट्टा टीमही नव्या उमेदीने नवीन
वर्षाला सामोरी जात आहे. अनघा बोडस आणि सीमा ढाणके ह्या उत्साही सदस्यांनी आपणहून कट्ट्यासाठी
काम करण्याची तयारी दाखविली आहे. त्यांचे मन:पूर्वक स्वागत!!!!!
ह्या महिन्याच्या
मुखपृष्ठावर चक्राचे चित्र आहे. दिवस-रात्र, वर्ष-महिने हे चक्र अविरत फिरत असते, आणि
कायम ते असेच फिरणार आहे. एका गतीची जाणीव हे चक्र आपल्याला करून देते. थांबला तो संपला
हे ते सांगत आहे. आपल्या वाटेला आलेल्या ह्या अमूल्य वेळेचे आपण काय करणार असा प्रश्न
हे चक्र विचारत आहे. ह्या दृष्टीने श्री. आळसे ह्यांची मुलाखत वाचण्यासारखी आहे.
या महिन्यात
आम्ही दिलेल्या 'तिळगुळ आणि मैत्री' या विषयावरही आम्हाला छान प्रतिसाद मिळाला आहे.
पुढील महिन्यासाठी 'प्रेम' हा विषय आहे. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा आपल्या लेखांमधून
वाचायला मिळतील याची आम्हाला खात्री आहे.
येणाऱ्या
वर्षात अधिकाधिक वाचकांना कट्ट्याशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या प्रतिसादाची
आणि सहकार्याची अपेक्षा आहे.आणि ती पूर्ण होईल असा विश्वास ही आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका
केल्याने होत आहे रे - मुलाखत श्री. आळसे - उल्का कुलकर्णी
किनाऱ्यावरचा चंद्र – अर्निका परांजपे
झलक एका चित्र प्रवासाची – सतीश कर्वे
----------------------------------------------
झलक एका चित्र प्रवासाची – सतीश कर्वे
----------------------------------------------
----------------------------------------------
अवचिता परिमळू – रवींद्र केसकर
शोध स्वत:चा – मानस
शांतता – श्रद्धा कुलकर्णी
----------------------------------------------
पुस्तक परीक्षण - दंशकाल - मीनल टोणगांवकर
मधले पान - स्नेहा केतकर
----------------------------------------------
बाजरीच्या पुऱ्या – श्वेता मोघे साठ्ये
शब्द सुरांच्या जगात - पाउस – प्रवरा संदीप
G B S– भाग – ४ - मी ICUमध्ये धपकन पडतो – आशीर्वाद आचरेकर
पाजू आनंदे - प्रीती ओसवाल
मित्रमंडळ बंगळूरू कट्टा हे मासिक संपादिका स्नेहा केतकर यांनी बंगळूरू येथे १ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केले.
मित्रमंडळ बंगळूरू कट्टा हे मासिक संपादिका स्नेहा केतकर यांनी बंगळूरू येथे १ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध केले.
No comments:
Post a Comment