कट्टा - ऑक्टोबर २०१९


सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके!
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!! 
                                    संपादकीय

गेल्या वर्षी ह्याच सुमारास मी 'कट्ट्याची 'ची संपादकीय जबाबदारी स्वीकारली. एक नवी टीम, एक नवा विचार घेऊन आम्ही कट्टा वाचकांसमोर आलो. पाठी वळून बघताना आज खूप समाधान वाटत आहे. 
गेल्या वर्षात अनेक वाचक-लेखकांना आम्ही कट्ट्याशी जोडण्याचा मनापासून प्रयत्न केला. आमच्या सर्व वाचक आणि लेखकांचे मनापासून आभार. आता नव्या वर्षीही आम्ही ही जबाबदारी समर्थपणे पार पडू असा विश्वास वाटतो आहे.
ह्या महिन्यापासून आम्ही काही नव्या लेखमाला घेऊन आपणासमोर येत आहोत. त्याबद्दलची माहिती वाचा 'स्वागत करताना...' ह्या लेखात. 
ह्या महिन्यात एक गणपती विसर्जनाचे सुंदर चित्र कट्ट्याकडे आले. योगायोगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची ह्याच विसर्जनावरची कविताही वाचनात आली. ह्या दोन्ही कलाकृती आपणासमोर ठेवण्याचा मोह आवरला नाही. चान्द्रयानावरची कविताही अशीच.     
मित्रमंडळाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला. साऱ्या कार्यक्रमांचा विस्तृत वृतांत फोटोसकट देत आहोत. 
चित्र चारोळ्या हा प्रयोग अनेकांना आवडला. अशाच काही कविता आणि चारोळ्या ह्याही अंकात देत आहोत. ह्याशिवाय वाचा 'जंगलाला आग लागली .....भाग २' पर्यावरणाचा सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणे हे गरजेचे आहे. कट्टा अंक आपल्यापर्यंत पोचेल तेव्हा घट बसले असतील. नवरात्रीच्या मंगलमय पर्वाला सुरवात झाली असेल. 
दसरा आणि दिवाळीच्या साऱ्या कट्टा प्रेमींना खूप खूप शुभेच्छा!
कट्टा वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. आमची मेल आयडी आहे - mitramandalkatta@gmail.com

स्नेहा केतकर

अनुक्रमणिका:

वैशाली वर्तक
प्रेरणा चौक
सतीश कर्वे
गंधाली सेवक
शुभदा पाठक
मानस
स्नेहा केतकर
स्नेहा केतकर

वृंदा जोशी
मधुरा ओगले-देव
अपर्णा जोगळेकर
अस्मिता ओंक
 स्वप्ना सोमण 


ज्योती कुलकर्णी
प्रीती ओसवाल
डॉ.पूर्वा रानडे
दिनेश शिंदे
डॉ.दिलीप कानडे


डॉ. शीतल बदामी 
  प्रतिसाद कट्टा सप्टेंबर २०१९ 

No comments:

Post a Comment