संपादकीय
सर्व वाचकांना महिला दिनाच्या शुभेच्छा!!!!!!!!
महिला दिनानिमित्त कट्टा एका नवीन आणि वेगळ्या स्वरुपात सादर करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
ह्या कट्ट्यात अनेक लेख आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या लेखांमध्ये अर्थातच कर्तबगार महिला आहेत. पण ह्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आहेत. 'कथा अंकुरची' मध्ये बंगलोर येथील 'स्नेहधारा' ह्या महिलांच्या संस्थेच्या अंकुर ह्या हस्तलिखिताची माहिती देण्यात आली आहे. गेली ४१ वर्षे 'अंकुर' तितक्याच उत्साहात ह्या सख्या प्रकाशित करत आहेत.

'नारी तू घे उंच भरारी' ह्या लेखात बंगलोरच्या काही मैत्रिणी जवळच्या एका खेड्यात जाऊन माँटेसरी शिक्षण प्रणाली त्या खेड्यातील महिलांना शिकवत आहेत. तर काही डेंटिस्ट मैत्रिणी सरकारी शाळांत जाऊन तेथील मुलांना दातांचे आरोग्य कसे सांभाळावे हे शिकवीत आहेत.
ह्या सगळया आपल्या जवळपासच्या मैत्रिणींचे कामही प्रेरणादायी आहे. 'मला भावलेली स्त्री' मध्ये लिहिलेल्या लेखांतही अनेकांनी आपल्या कृतज्ञ आठवणी जागवल्या आहेत.
याशिवाय सिनेमा, पुस्तके, यासारख्या अनेक विषयांवरही लेख आहेत. भरगच्च अशा ह्या कट्ट्यातील सगळे लेख जरूर वाचा आणि आपल्या लेखकांना प्रोत्साहन द्या.
मुखपृष्ठासाठी मदत दीपा परांजपे आणि अल्का देशपांडे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका:
--------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment