साधारण एक वर्षापूर्वी, कट्टा परिवारात सहा लेखकांना बरोबर घेऊन
आम्ही सदरं चालू केली. कट्ट्याला एक
भरीव स्वरूप देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता - आणि आमच्या अपेक्षेपेक्षा तो
जास्त यशस्वी ठरला. यातली चार सदरं या अंकाबरोबरच संपताहेत - आणि काही
नवीन चालू होताहेत. पण त्याबद्दल संपादकियात; इथे त्या चार लेखकांबद्दल चार शब्द!!
पाहिलं सदर - नवीन काळे
यांचं. नवीन काळे एक पब्लिश्ड लेखक; त्यांची चार पुस्तकं प्रकाशित झाली
आहेत. ते एक नियमित ब्लॉगलेखक आहेत. त्यांना त्यांच्या इतर व्यवसायातून वेळ काढून
आमच्यासाठी लिहिण्याबद्दल विचारलं आणि अशा उपक्रमाला मदत केलीच पाहिजे म्हणत
त्यांनी आम्हाला लेख देण्याचं मान्य केलं. काळे यांचं लिखाण विविध विषयांवर आहे.
सगळे ललित लेख आहेत. काळे यांच्या लिखाणात एक सामाजिक बांधिलकी जाणवते. तरीही
त्यांचं लिखाण हलकं फुलकं असतं. त्या लिखाणातून एखादा विचार करायला लावणारा संदेश
ते हळूच देऊन जातात आणि त्यामुळे त्यांचे लेख स्मरणीय ठरतात. कट्ट्यात प्रकाशित
झालेले - नवीन काळे यांचे लेख खालीलप्रमाणे - वाचकांच्या सोयीसाठी इथे एकत्र:
Nov-18
|
|
Dec-18
|
|
Jan-19
|
|
Feb-19
|
|
Mar-19
|
|
Apr-19
|
|
Aug-19
|
आमच्या दुसऱ्या लेखिका
आणि तेवढ्याच ताकदीच्या गायिका, प्रवरा संदीप. प्रवरा यांचे लेख वाक्श्राव्य शैलीचा सुखद अनुभव
आहेत. प्रत्येक लेख हा एका कवितेचं रसग्रहण आणि त्या विवेचनातले पदर उलगडून दाखवणारा त्या कवितेचा श्राव्य
अनुभव. प्रवराताईंनी आमच्यासाठी इतके कष्ट घेतले; एखाद्या कवितेचं रसग्रहण करून ते
लिहून काढायचं आणि त्याच बरोबर त्या कविताला चाल लावून गायची आणि त्याचा video करून लेख तयार करायचा -
हे सगळं त्यांनी कट्ट्याच्या वाचकांसाठी केलं, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. या
वेगळ्या लेखांची आठवण आमच्या चोखंदळ वाचकांना बराच काळ राहील यात शंका नाही. या
सगळ्या लेखांची यादी पुनःप्रत्ययासाठी खाली देत आहोत.
| |||||||||||||||||
अशीच एक वेगळी लेखमाला
आम्हाला श्वेता मोघे-साठ्ये यांनी दिली. वरवर पाहता ही पाककृतींची लेखमाला आहे.
श्वेताताईंच्या आवडीच्या (आणि त्यांना व्यवस्थितच जमणाऱ्या पदार्थांचं हे वर्णन!) पण श्वेताताईंनी त्या पदार्थांबरोबर
निगडित असलेल्या त्यांच्या आठवणींचा इतका सुरेख गोफ विणला की आमचे काही वाचक त्या
आठवणींच्या जास्त प्रेमात पडले. कऱ्हाड या गावाबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना
तर यातले काही लेख फारच भावून गेले. पश्चिम महाराष्ट्रातलं एक छोटेखानी गाव.
कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमामुळे प्रसिद्ध असलेलं; साधी माणसं; साध्या आठवणी; आणि त्या आठवणींशी निगडित सुरेख पदार्थ -
एकंदरीतच लज्जतदार लेखमाला.
Sep-17
|
|
Jan-19
|
|
Feb-19
|
|
Mar-19
|
|
Apr-19
|
|
Jun-19
|
|
Jul-19
|
|
Aug-19
|
चौथी लेखमाला एका धैर्यवान लढ्याची. आमचे एक मित्र आशीर्वाद आचरेकर किरकोळ आजाराच्या शंकेने डॉक्टरांकडे गेले आणि एका फारश्या माहीत नसलेल्या GBS आजाराचं निदान घेऊन परतले तेथून दहा आठवड्यांचा हॉस्पिटलचा प्रवास या लेखमालेत त्यांनी मांडलेला आहे. जिद्द, चिकाटी, अडचणीच्या काळात, जवळचे का आणि कसे जवळचे असतात याचा प्रत्यय आशीर्वाद यांनी इतक्या सुरेख शब्दात मांडला आहे. यात त्यांना या लेखमालेचे भाषांतर करणाऱ्या त्यांचा मित्रांची उत्तम साथ लाभली. आजारात सापडलेल्या रुग्णाची अगतिकता, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईकांची तगमग; डॉक्टरांनी तू-लवकर-बरा-होऊन-घरी-जा/जायलाच हवं अशा जिद्दीने केलेली...उपचारपद्धती - या सगळ्याचं वर्णन करणारी एक वाचनीय लेखमाला...
Oct-18
|
|
Nov-18
|
|
Dec-18
|
|
Jan-19
|
|
Mar-19
|
|
Apr-19
|
|
May-19
|
|
Jun-19
|
|
Jul-19
|
|
Aug-19
|
एकदम चार लेखमाला संपतात
तेव्हा संपादकमंडळाला जरा घामच फुटतो. त्यातून या लेखमालांनी आम्हाला अनेक नवीन वाचक मिळवून
दिलेले आहेत. एक वेगळा दर्जा कट्ट्याला प्राप्त करून दिला आहे. अशाच अजून नवीन
लेखमाला घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. आपला लोभ आहेच - तो वृद्धिंगत व्हावा
अशी इच्छा. आणि तसा प्रयत्न आम्ही करत राहू हा आमचा इरादा.
अभिजीत टोणगावकर
No comments:
Post a Comment